Advertisement Advertisement

“पाणंद रस्त्यांना आता लागणार वेग; दोन महिन्यांत काम संपवायचा आदेश!”अधिकाऱ्यांना ठणकावलं…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यात पाणंद रस्ते योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी मोठी बैठक पार पडली. शेतकऱ्यांना शेतापर्यंत सहज जाता यावं, मालाची ने-आण सोपी व्हावी आणि गावागावातली जोडणी मजबूत व्हावी, यासाठी ही कामं लवकरात लवकर पूर्ण करायची गरज असल्याचं स्पष्ट करण्यात आलं.

बैठकीत अधिकाऱ्यांना थेट शब्दात सुनावण्यात आलं की, “आता वेळ खेचायची नाही… दोन महिन्यांत सगळी प्रलंबित पाणंद रस्त्यांची कामं पूर्ण झाली पाहिजेत!” कामात कसलीही ढिलाई चालणार नाही, यासाठी नियमित पाहणी आणि सगळ्यांनी एकत्रित समन्वय ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

या बैठकीला उपविभागीय अधिकारी शरद पाटील, उपजिल्हाधिकारी जयश्री ठाकरे, तहसीलदार विजय सवडे, गटविकास अधिकारी समाधान वाघ, अमिता पवार, अप्पर तहसीलदार सौरभ गावंडे, नायब तहसीलदार अनंता पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच शंतनु बोंद्रे, डॉ. कृष्णकुमार सपकाळ, अमोल साठे, संतोष परिहार, संदीप उगले यांसारखे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरही मोठ्या संख्येने हजर होते.

भूमी अभिलेख, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद यांनी एकत्र येऊन अडथळे दूर करावेत आणि कामांना वेग द्यावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. प्रशासन आता कामाला लागलं असून, पुढच्या दोन महिन्यांत पाणंद रस्त्यांची कामं धडाक्यात पूर्ण होतील, अशी चिन्हं दिसत आहेत.

यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, “आता तरी रस्त्यांचा प्रश्न सुटतोय का?” असा आशेचा सूर गावागावातून ऐकू येतोय.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!