Advertisement Advertisement

बुलढाणा जिल्हा बँक निवडणुकीत दिग्गजांची एन्ट्री; तीन दिवसांत १९७ नामांकन अर्ज दाखल! २१ जागांसाठी रंगणार प्रतिष्ठेची लढत; अर्ज भरण्याचा २४ जुलै अखेरचा दिवस….

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज):सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेची समजली जाणारी बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. २१ संचालक पदांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी पहिल्या तीन दिवसांत एकूण १९७ नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत शुक्रवार, २४ जुलै म्हणजेच आज असल्याने शेवटच्या दिवशीही मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बुधवार (२२ जुलै) अखेरपर्यंत ३० अर्ज दाखल झाले होते. मात्र गुरुवारी (२३ जुलै) तब्बल १६७ अर्ज दाखल झाल्याने एकूण अर्जांची संख्या १९७ वर पोहोचली. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रंगत अधिक वाढली आहे.

गुरुवारी दाखल झालेल्या अर्जांमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, कामगार मंत्री आकाश फुंडकर, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले, वृषाली बोंद्रे, शिवाभाऊ तायडे यांच्यासह विविध राजकीय पक्ष व सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

याशिवाय पुरुषोत्तम वायाळ, विजय चोपडे, सुरेखा चोपडे, दिलीप नाफडे, वंदना नाफडे, गणपत कुसळकर, राजू मुळे, जयश्री पुंडकर, अशोकराव हिंगणे, दत्तात्रय भुतेकर, विक्रांत मापारी, मनोज दांडगे, रुपाली बनकर, प्रदीप हेलगे, पांडूरंग पाटील, ज्ञानेश्वर पाटील, संजय गायकवाड, गिरीश कोल्हे, किरण राठोड, तेजराव मारोडे, विश्वनाथ झाडोकार, विलास बचाटे, गोविंद मापारी, तेजराव नरवाडे, जयश्री खाकरे, परीक्षित ठाकरे, अरुण तायडे, प्रमोद सपकाळ, राजेश देशमुख, दिलीप अढाव, जयराज जाधव, जितेंद्र जैन, विनायक टाले, जयवंतराव जाधव, निलेश शर्मा, राजू सावळे, अंकुशराव पाटील, रामविजय बुरुंगले, रफीक घुसर, राजश्री जाधव, उल्हासराव जाधव, माधवराव जाधव, मयूर बाहेकर, श्रीकांत मारोडे, गौरव गावंडे, भगवान धांडे, नितीन पातुरकर आदींसह अनेक इच्छुक उमेदवारांनीही नामांकन अर्ज दाखल केले.

अनेक उमेदवारांचे एकापेक्षा अधिक अर्ज

निवडणुकीतील विविध मतदारसंघांतून संधी कायम ठेवण्यासाठी अनेक उमेदवारांनी एकापेक्षा अधिक नामांकन अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष उमेदवारांच्या तुलनेत अर्जांची संख्या अधिक झाली असून, छाननी आणि अर्ज माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्हा बँकेच्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!