बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर काँग्रेसने केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शनिवारी बुलढाणा येथील जयस्तंभ चौकातील काँग्रेस जिल्हा कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष काळे यांनी काँग्रेसवर टीका करत सांगितले की, पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करून जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असून लोकशाहीच्या मर्यादा आणि संविधानिक पदाचा सन्मान राखणे प्रत्येक राजकीय पक्षाचे कर्तव्य आहे. कोणतेही आंदोलन कायद्याच्या चौकटीत राहूनच केले गेले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
या आंदोलनात भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष काळे पाटील, योगेश राजपूत, विजय खरे, शुभम देसाई, संतोष डोईफोडे, सतीश भाकरे पाटील, मंदार बाहेकर, सुनील देशमुख, शैलेश देशमुख, निखिल पडघान, किशोर सोळंकी, दत्ता पाटील, सतीश गावंडे, वसुदेव राजपूत, नाना गायकवाड, नीरज गायकवाड, विजय वाळेकर, आकाश चुनावाले, अशोक मेहेत्रे, दीपक घुगे, संतोष पवार, विनोद झोरे, सतीश मवाळ, सर्वेश वानखेडे, शुभम पाटील, अजय सास्ते, शुभम वानखेडे यांच्यासह भारतीय जनता पक्ष व भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.














