नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): अमरावती–सुरत एक्सप्रेस (क्र. २०९२६) मधून शेगाव ते सुरत असा प्रवास करत असताना २१ वर्षीय विवाहित महिला नांदुरा रेल्वेस्थानकावर सासऱ्यांची नजर चुकवून रेल्वेतून उतरून स्थानकाबाहेर निघून गेल्याची घटना २० जुलै रोजी घडली. संबंधित महिला गर्भवती असल्याने तिच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे.
बेपत्ता महिलेचे नाव सौ. सानिका राहुल धारपवार (वय २१), रा. भोईपुरा वॉर्ड क्र. १, तेल्हारा, जि. अकोला असे आहे. तिची उंची सुमारे ५ फूट ४ इंच असून रंग सावळा, चेहरा गोल, नाक सरळ, डोळे मोठे, शरीरयष्टी सडपातळ आणि केस लांब काळे आहेत. अंगावर ग्रे रंगाचा पंजाबी ड्रेस, हिरवट रंगाचा स्कार्फ, गळ्यात मंगळसूत्र आणि कानात सोन्याच्या रिंग्ज असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या प्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाणे, शेगाव येथे बेपत्ता व्यक्तीची नोंद करण्यात आली आहे. संबंधित महिलेबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास किंवा ती कोठे आढळून आल्यास पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन मेटांगे यांच्याशी मो. ८७८८७९०४४५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.














