Advertisement Advertisement

युवराज फॅशनजवळील टेलरचा दुकानातच कुजलेल्या अवस्थेत मृतदेह; खामगावात खळबळ….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील मेन रोडवरील युवराज फॅशनजवळ असलेल्या एका टेलरच्या दुकानात ६० वर्षीय टेलरचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना गुरुवार (२३ जुलै) रोजी दुपारी उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, वसंता किसन उटाळे (वय ६०, मूळ रा. वामन नगर, सध्या जलालपुरा, खामगाव) यांचे युवराज फॅशनजवळ टेलरचे दुकान असून ते त्याच दुकानात वास्तव्यास होते. गुरुवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास दुकानातून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले.

याची माहिती उटाळे यांचे पुतणे नितीन शिवाजी उटाळे यांना देण्यात आली. त्यांनी दुकानाचे शटर उघडून पाहिले असता, आत वसंता उटाळे यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्यानंतर तातडीने खामगाव शहर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. पुढील तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!