Advertisement Advertisement

शेकडो मधमाशा चावल्याने एक शेतकरी दगावला; तर दुसरा अडीच तास विहिरीत..

रायपुर (बुलडाणा कव्हरेज न्युज)शेतात काम करत असताना मधमाशांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पळसखेड भट येथे घडली आहे. सोबतच्या मजुराने प्रसंगावधान दाखवत विहिरीत उडी घेऊन स्वतःचा जीव वाचवला.

. जाहिरात 👆

मिळालेल्या माहितीनुसार, शेतात काम सुरू असताना अचानक मधमाशांच्या मोठ्या थव्याने हल्ला चढवला. यावेळी शेतकरी आणि सोबत असलेला मजूर जीव वाचवण्यासाठी पळू लागले. मात्र, शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात मधमाशांनी चावल्याने तो गंभीर जखमी झाला.

दरम्यान, सोबत असलेल्या मजुराने विहिरीत उडी घेऊन स्वतःचा जीव वाचवला. जखमी शेतकऱ्याला तातडीने उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याचा मृत्यू झाला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!