Advertisement Advertisement

“वाढदिवसाचा जल्लोष नाही, आरोग्याची भेट!”केक कापण्याऐवजी आरोग्यसेवेचा संकल्प! मलगीत मोफत आरोग्य शिबिरात १०० पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला लाभ….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चिखली तालुका अध्यक्ष संजय सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली तालुक्यातील मलगी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून १०० हून अधिक रुग्णांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

शिबिरात विविध आजारांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर रुग्णांना आवश्यकतेनुसार मोफत औषधे व गोळ्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा गावातच उपलब्ध झाली.

या आरोग्य शिबिरासाठी चिखली शहरातील नामवंत तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली तसेच योग्य उपचार व आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. डॉक्टरांच्या सेवेमुळे शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

यावेळी आयोजकांनी सांगितले की, वाढदिवस साजरा करण्याऐवजी समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत अशा समाजहिताच्या कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!