Advertisement Advertisement

“मध्यरात्री घरातून निघाली तरुणी… सकाळी उठल्यावर घरच्यांचा धक्का!”

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील चांदमारी परिसरातून २० वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी खामगाव शहर पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी ८ एप्रिल रोजी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास घरातील सदस्य झोपेत असताना कोणालाही न सांगता घराबाहेर पडली. सकाळी हा प्रकार लक्षात येताच कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली.

यानंतर कुटुंबीयांनी परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोधाशोध केली. मात्र, तिचा कुठलाही ठावठिकाणा लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

या घटनेचा तपास पोहेकॉ रामेश्वर फासे यांच्याकडे सोपविण्यात आला असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. तसेच नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, संबंधित तरुणीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ खामगाव शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!