Advertisement Advertisement

“आम्ही पोलीस हाय” म्हणत भरदिवसा गंडा; शेतकऱ्याची सोन्याची अंगठी केली साफ…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरात भरदिवसा दोन भामट्यांनी “आम्ही पोलीस हाय” असं सांगून एका शेतकऱ्याला चक्क गंडा घातल्याची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकारामुळे गावात चांगलीच खळबळ उडालीये.

मिळालेल्या माहितीनुसार, काशीनाथ डोईफोडे (वय ५५, रा. डोलखेडा खुर्द, ता. जाफ्राबाद, जि. जालना) हे २ एप्रिलला दुपारी देऊळगाव राजा येथील भगवती स्वीट मार्ट समोर उभे होते. त्याच वेळी दोन अनोळखी इसम त्यांच्या जवळ आले.

“आम्ही पोलीस हाय” असं सांगत त्यांनी चौकशीचा बहाणा केला. विश्वास बसावा म्हणून त्यांनी डोईफोडे यांच्या हातातली ९ ग्रॅमची सोन्याची अंगठी काढून घेतली. पण चलाखी अशी की, खरी अंगठी लंपास करून त्यांच्या हातात नकली अंगठी देऊन दोघेही लगेच पसार झाले.

थोड्या वेळाने आपल्याला गंडा घातल्याचं लक्षात येताच डोईफोडे यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!