Advertisement Advertisement

दुसऱ्या मजल्यावरून पडून मिस्त्रीचा मृत्यू; बुलढाणा शहरातील घटना….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):शहरात स्लॅब टाकण्याच्या कामादरम्यान घडलेल्या दुर्घटनेत एका मिस्त्रीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १० एप्रिल रोजी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कडूबा नाथा झिने (वय ४८, रा. क्रांतीनगर) असे मृत मिस्त्रीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वॉर्ड क्रमांक २ मधील भीमनगर येथे संजय जाधव यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. त्या ठिकाणी १० एप्रिल रोजी स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. यावेळी झिने हे सेंट्रिंगचे काम करीत असताना अचानक त्यांचा तोल जाऊन ते दुसऱ्या मजल्यावरून थेट जमिनीवर कोसळले.

या घटनेत ते गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

कडूबा झिने यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार असून, त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबाचा आधारच हिरावला गेला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

घटनेनंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!