Advertisement Advertisement

मुरूमाच्या किरकोळ कारणावरून वाद; अंढेरा येथे मारहाणीची घटना, सहा जणांवर गुन्हा…

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज): मुरूम भरून नेल्याच्या किरकोळ कारणावरून वाद निर्माण होऊन त्याचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना अंढेरा येथे १३ एप्रिल रोजी घडली.

अंढेरा पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री रामेश्वर केदार (वय २२) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांच्या घराशेजारी संगीता प्रल्हाद नागरे यांचे घर असून, त्यांच्या कुटुंबीयांकडून नेहमीच छोट्या-मोठ्या कारणावरून फिर्यादीच्या आईशी वाद घातला जात असे.

११ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ११ वाजता संगीता नागरे या फिर्यादीच्या घरासमोर येऊन “तुम्ही आमचा मुरूम घेतला आहे” असा आरोप केला. यावर फिर्यादीच्या आईने “आम्ही मुरूम घेतलेला नाही” असे सांगितले असता, संगीता नागरे यांनी शिवीगाळ सुरू केली.

दरम्यान, वाद सोडविण्यासाठी भाग्यश्री केदार मध्यस्थी करण्यासाठी गेल्या असता आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करत लोटपाट करून लाथाबुक्यांनी मारहाण केली, असे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी संगीता प्रल्हाद नागरे, संजय प्रल्हाद नागरे, गणेश प्रल्हाद नागरे, प्रल्हाद लक्ष्मण नागरे (रा. अंढेरा) व विठ्ठल किसन मुंडे (रा. नागनगाव) यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम १८९(२), २९१(२), १९०, ३५१(२), ३५२, ११५(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!