Advertisement Advertisement

घरून आई वडिलांना सांगितलं कॉलेजला जाते म्हणाली…“बस चुकली” मग काय मेसेज करून थेट गायब झाली….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी बेपत्ता होण्याच्या घटना घडल्यात, त्यामुळं सगळीकडे चिंतेचं वातावरण तयार झालंय.

पहिली घटना मोताळा तालुक्यातल्या गुगळी गावातली. जयश्री ऊर्फ पूजा पांडुरंग सपाटे (वय १८) ही तरुणी १० एप्रिलला सकाळी “कॉलेजला जाते” असं सांगून घरातून निघाली. संध्याकाळी ५ च्या सुमारास तिनं मामाला मेसेज केला की, “माझी बस चुकली, रात्री ८ ची बस पकडते.” पण त्यानंतर ती काहीच घरी परतली नाही.

घरच्यांनी कॉलेजमध्ये चौकशी केली तर ती त्या दिवशी कॉलेजलाच गेली नव्हती, असं समजलं. नातेवाईक, मैत्रिणीकडे सगळीकडे शोध घेतला, पण काहीच पत्ता लागला नाही. शेवटी मामानं पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी मिसिंग दाखल करून शोधमोहीम सुरू केलीये.

दुसरी घटना मेहकर तालुक्यातल्या डोणगावची. सीमा रवी वऱ्हाडे (वय २६) या १० एप्रिलच्या सायंकाळी घरातून बाहेर पडल्या, पण परतल्याच नाहीत. पतीनं सगळीकडे शोध घेतला, पण काहीच धागादोरा लागला नाही. शेवटी ११ एप्रिलला पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली.

या दोन्ही घटनांमुळं कुटुंबीयांची अवस्था बिकट झाली असून, “आपले माणसं कुठं गेली?” या विचारानं त्यांचा जीव अक्षरशः टांगणीला लागलाय. पोलिसांकडून कसून तपास सुरू असून, लवकरात लवकर दोघींचा शोध लागावा अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!