Advertisement Advertisement

त्याला दारूचे व्यसन होते; तिला तो माहेरहून १.५० लाखांची मागणी करत होता! विवाहितेचा छळ, ६ जणांवर गुन्हा दाखल…

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): माहेरहून १ लाख ५० हजार रुपये आणण्याचा तगादा लावून शारीरिक व मानसिक छळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका विवाहितेच्या तक्रारीवरून सासरकडील सहा जणांविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सौ. लक्ष्मी राहुलकुमार देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचे पती राहुलकुमार मुरलीधर देशमुख यांना दारूचे व्यसन असून ते दारूच्या नशेत वारंवार वाद घालून त्रास देत होते. तसेच सासरे मुरलीधर गणपत देशमुख, सासू जयश्री मुरलीधर देशमुख, नणंद राजश्री सुनिल बढे, वैशाली विरेंद्र खर्चे व स्मिता संदीप कोलते (सर्व रा. मलकापूर) यांनीही माहेरहून १ लाख ५० हजार रुपये आणण्याचा तगादा लावत सतत मानसिक छळ केला.

तक्रारीनुसार, संबंधित आरोपींनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अप. नं. ७१/२०२६ अन्वये कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(२)(३) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास बिट अंमलदार सहाय्यक फौजदार टाकरखेडे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!