Advertisement Advertisement

निळेगावात किरकोळ वादातून दगडफेक; आई-मुलगा जखमी, गुन्हा दाखल..

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील निळेगाव येथे साखरपुड्याच्या निमित्ताने निमंत्रण देताना झालेल्या किरकोळ वादातून दगडफेकीची घटना घडून आई-मुलगा जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. १२) सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी संजय जंगलुमन हिवराळे (वय ४९, रा. निळेगाव, ता. खामगाव) हे आपल्या चुलत भावाच्या मुलाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गावातील नागरिकांना निमंत्रण देत होते. दरम्यान, सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास आरोपी राजू विनायक भोजने (रा. निळेगाव) याने फिर्यादीस उद्देशून शिवीगाळ करत वाद घातला.


वाद वाढत गेल्याने आरोपीने संतापाच्या भरात फिर्यादीवर दगडफेक केली. यात त्यांच्या डोक्याला मार लागून ते जखमी झाले. भांडणाचा आवाज ऐकून फिर्यादीची आई जिजाबाई हिवराळे या मध्यस्थी करण्यासाठी आल्या असता आरोपीने त्यांच्यावरही दगडफेक केली. त्यामुळे त्या देखील जखमी झाल्या.


या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनेची नोंद घेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!