Advertisement Advertisement

घरच्यांना सांगितलं शौचास जाऊन येते; रात्र झाल तरी ती आलीच नाही! शोध घेतला तर बहिणाचा मुलगा घरी नाय म्हणते?

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नातेवाईक असलेल्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या वडिलांनी २७ एप्रिल रोजी अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, १५ एप्रिल रोजी ते देऊळगाव मही येथून घरी परत आले असता मुलगी घरी दिसली नाही. पत्नीला विचारणा केली असता, मुलगी शौचास जाते असे सांगून घराबाहेर गेल्याचे सांगण्यात आले. मात्र रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही.

यानंतर नातेवाईक व परिसरात शोध घेतला असता मुलगी कुठेही आढळून आली नाही. दरम्यान, चुलत बहिणीच्या घरी चौकशी केली असता तिचा मुलगा नितीन हा देखील सायंकाळपासून घरातून बेपत्ता असल्याचे समोर आले. त्यामुळे नितीन यानेच मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या तक्रारीवरून ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार कायंदे यांनी आरोपी नितीन कदम याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!