Advertisement Advertisement

मेरा खुर्दात शिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रताप जयंती उत्साहात! भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष काळे यांच्या हस्ते प्रतिमेच्या फलकाचे अनावरण…

चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथे वीर शिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेच्या फलकाचे अनावरण भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष काळे पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

कार्यक्रमात महाराणा प्रताप यांच्या शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. युवकांनी घोषणाबाजी करत जयंती उत्सव जल्लोषात साजरा केला.

यावेळी शिवसेना नेते बाळूभाऊ वराडे, सरपंच रमेश अवचार, सुदाम शिंदे, सोमेश इंगळे, दीपक शिंगणे, विशाल थुट्टे, नदीमभाई देशमुख, अनिस शाह, सर्जेराव गवई, महेंद्र वाघमोडे आणि शिवाजी उदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच दत्ता उदार, दिगंबर उदार, कैलास उदार, दानिश देशमुख, अविनाश जंगले, अनिकेत जंगले, राहुल काळे, अमोल काळे, विशाल काळे, अनिल उधार, दिलीप गुजर, योगेश गुजर, विशाल गुजर, राहुल गुजर, सोहम गुजर, सतीश वाघमारे, कांतीलाल गुजर, अमोल मोळांडे, दीपक मोळांडे, सिताराम घोडे, प्रकाश घोडे, प्रकाश भुसारी, बबलू काळे, भागवत काळे, वेदांत चव्हाण, श्रीकांत चव्हाण, मयूर गुजर, रवी गुजर, किरण गुजर, चंदू गुजर, पंकज गुजर, आकाश गुजर, तुषार गुजर, नीलकंठ गुजर, विश्वंभर वाघमारे, दशरथ काळे, तुषार पडघान, विनायक उदार, गजू जंगले, मंगेश जंगले, विनोद उधार, अमोल उदार, पवन उदार, मोहन कुदळे, गौरव जंगले, सतीश मोहबे आणि गणेश राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी महाराणा प्रताप यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!