Advertisement Advertisement

आमदाराच्या नावाचा धाक दाखवत आई-बहिणीवर हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा…

मेरा बुद्रुक (बुलडाणा कव्हरेज न्युज): दुचाकीवरून जात असताना अडवून “आमदाराचे माणूस आहोत” असा धाक दाखवत आई व बहिणीवर मारहाण केल्याची धक्कादायक घटना देऊळगाव राजा तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरज राठोड (वय २१) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, फिर्यादीची आई व बहिण या दुचाकीवरून जात असताना तीन आरोपींनी त्यांना अडवले. “आमदाराचे माणूस आहोत” असे सांगत त्यांनी शिवीगाळ केली व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच गाडीची चावी काढून घेऊन दुचाकीचे नुकसान केल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल…

या प्रकरणात आरोपींवर भारतीय दंड संहिता तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!