चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज)तालुक्यातल्या उदयनगर भागात एक धक्कादायक प्रकार समोर आला हाय. माहेरी जाते म्हणत घरातून निघालेली १९ वर्षांची नवविवाहित मुलगी मधेच कुठं गायब झाली, यामुळे सगळ्या परिसरात खळबळ उडाली हाय.
हिवरखेड गावचे येथील एका पुरुषाची बायको अनुराधा (वय १९) हिने १७ मार्चला दुपारी चारच्या सुमारास “मी माहेरी किन्ही सवडतला जाते” असं सांगितलं आणि ऑटो पकडून निघाली. पण बराच वेळ गेला तरी ती माहेरी पोहोचलीच नाही.
नातेवाईकांकडे, ओळखीच्या लोकांकडे सगळीकडे शोधाशोध झाली, पण तिचा कुठेच मागमूस लागला नाही. शेवटी १८ मार्चला पोलिसांत मिसिंगची नोंद करण्यात आली.
या प्रकरणाचा तपास सध्या पोलीस उपनिरीक्षक सिरसाट करतायत. दरम्यान, या बेपत्ता महिलेबद्दल काही माहिती मिळाली तर लगेच अमडापूर पोलिसांशी संपर्क साधा, असं आवाहन पोलिसांनी केलं हाय.











