Advertisement Advertisement

अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्ह्यात इंधन टंचाई नाही!–जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): आखातात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसची टंचाई निर्माण झाल्याच्या अफवा काही असामाजिक तत्त्वांकडून पसरवल्या जात आहेत. मात्र जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहे.

काही ठिकाणी घरगुती गॅसची बेकायदेशीर साठवणूक केली जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. यावर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष पथके स्थापन केली असून जिल्हा प्रशासन व पोलीस विभागामार्फत साठेबाजी करणाऱ्यांवर तसेच अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

इंधन कंपन्या बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल यांच्या माध्यमातून जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचा पुरवठा नियमित सुरू असल्याने कोणतीही टंचाईची परिस्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता गरजेनुसारच इंधन खरेदी करावे व बेकायदेशीर साठेबाजी टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

इंधन पुरवठ्याबाबत तक्रार असल्यास किंवा कुठे साठेबाजी व काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी नैसर्गिक आपत्ती कक्ष, बुलढाणा येथे किंवा दूरध्वनी क्रमांक ०७२६२-२४२६८३ वर तात्काळ संपर्क साधावा, असेही प्रशासनाने कळविले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!