Advertisement Advertisement

पोरीला गोड बोलून नेलं;भरोसा ठेवला, तरी पण फसलीच! शेवटी त्याने भररस्त्यात घडवलं…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक, मारहाण व मौल्यवान दागिने तसेच रोकड चोरी केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीवरून शेख एफाज शेख अनिस (वय २८, रा. बर्डे प्लॉट) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, १८ एप्रिल रोजी दुपारी आरोपीने पीडितेला दुचाकीवरून शेगाव रोडवर नेले. तेथे लग्नास नकार देत तिला दुचाकीवरून खाली ढकलून काठीने मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली.

याशिवाय आरोपीने पीडितेकडील सोन्याची पोत, दोन अंगठ्या, दोन जोड कानातले (अंदाजे ४ तोळे, किंमत सुमारे ४ लाख रुपये) तसेच घरातील सुमारे ३ लाख रुपये रोख रक्कम असा एकूण जवळपास ७ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा आरोप आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!