Advertisement Advertisement

पैशांसाठी नवऱ्याचा तांडव! बायकोच्या डोक्यात काठी घातली, रक्तबंबाळ केलं अन् जीवे मारण्याची धमकी….

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मुलाच्या गल्ल्यातील पैसे घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादात पतीने पत्नीला काठीने मारहाण करून डोक्यात दुखापत केल्याची घटना मोताळा शहरातील खरबडी रोड परिसरात घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून तिच्या पतीविरुद्ध बीएनएसच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत वृषाली राहुल हेलोडे (वय २४, रा. खरबडी रोड, मोताळा) यांनी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीनुसार, त्यांचे पती राहुल प्रितम हेलोडे यांना दारूचे व्यसन असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे १० वाजता राहुल हेलोडे यांनी मुलाच्या गल्ल्यातील पैसे घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर संतप्त झालेल्या राहुल यांनी पत्नी वृषाली यांच्या डोक्यात काठीने मारल्याचा आरोप आहे.

या मारहाणीत वृषाली यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतरही पतीने त्यांच्याशी लोटपाट करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप महिलेने केला आहे.

महिलेचा तोंडी रिपोर्ट तसेच वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे बोराखेडी पोलिसांनी राहुल हेलोडे यांच्याविरुद्ध बीएनएसच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!