Advertisement Advertisement

शिक्षकांच्या निवडणुकीत भारीच गर्दी! शेवटच्या दिवशी अर्जांचा पाऊस पडला! २० उमेदवारांनी भरले तब्बल २९ अर्ज आता रिंगणात कोण टिकतंय, याकडे सगळ्यांचं लक्ष!

अमरावती (बुलडाणा कव्हरेज न्युज) : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला मंगळवार, ६ ऑक्टोबर रोजी पूर्णविराम मिळाला. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल २० उमेदवारांनी २९ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. तसेच दोन व्यक्तींनी नामनिर्देशनपत्रे घेतली. त्यामुळे आतापर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या ३१ वर पोहोचली आहे.

शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये सुमित सुरेशराव पवार (अपक्ष), उपेंद्र बाबाराव पाटील (शिवसेना व अपक्ष), संगीता सचिंद्र शिंदे-बोंडे (भाजप व दोन अपक्ष), विनोद प्रल्हाद कडू (अपक्ष), दिलीप भीमराव कडू (अपक्ष), सजील खान खलील खान (अपक्ष), श्रीकृष्ण सूर्यभान पहुरकर (अपक्ष), अदिती ऋषिकेश पोहरे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व तीन), भोयर चंद्रशेखर ऊर्फ शेखर मनोहरराव (भाजप व अपक्ष), प्रा. डॉ. संतोष श्रीकृष्ण हुशे (अपक्ष), नितीन सुभाषराव आगे (अपक्ष व तीन), प्रिती हर्षल रेवणे (राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी व अपक्ष), गजानन रामचंद्र उल्हे (अपक्ष), मिलिंद तुकाराम ब्राह्मणे (अपक्ष), किरण अर्जुन चौधरी (अपक्ष), हेमलता दिलीपसिंग मुनोत (अपक्ष), किरण अर्जुन पवार (अपक्ष), राजेशकुमार शालिग्राम कड (अपक्ष), प्रा. अनिल मधुकरराव काळे (बळीराजा पार्टी) आणि रामदास संपतराव कटक (अपक्ष) यांचा समावेश आहे.

आता निवडणूक प्रक्रियेत पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणजे नामनिर्देशनपत्रांची छाननी. बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त, अमरावती विभाग यांच्या कार्यालयातील सभाकक्ष क्रमांक २, तळमजला, विभागीय आयुक्त कार्यालय, कॅम्प, अमरावती येथे छाननी होणार आहे.

छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्याची संधी मिळणार आहे. उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना शुक्रवार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त, अमरावती विभाग किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहआयुक्त (सामान्य प्रशासन), विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती यांच्याकडे देता येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार ही संपूर्ण प्रक्रिया पार पडत आहे. आता छाननीमध्ये कोणते अर्ज वैध ठरतात आणि उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार राहतात, याकडे अमरावती विभागातील शिक्षक मतदारांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!