Advertisement Advertisement

खामगावात पत्नीशी झालेल्या वादाचा जाब विचारताच चौघांचा तरुणावर हल्ला! लाकडी राफ्टरने केली बेदम मारहाण; शिवीगाळ करीत जीवे मारण्याचीही धमकी….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : पत्नीशी झालेल्या वादाचा जाब विचारण्याच्या कारणावरून चौघांनी मिळून एका तरुणाला लाकडी राफ्टरने मारहाण केल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी रात्री आठवडी बाजार परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत हसन खान बशीर खान (वय ३५, रा. शौकत कॉलनी, खामगाव) यांनी पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीनुसार, १८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास हसन खान हे आठवडी बाजार परिसरात असताना नसीर खान बशीर खान (वय ४०), समीर खान नसीर खान (वय २२), रिहान खान नसीर खान (वय २५, तिघेही रा. चिखली) आणि गुड्डु खान सरदार खान (रा. शौकत कॉलनी, खामगाव) हे तेथे आले.

यावेळी हसन खान यांच्या पत्नी चिखली येथे त्यांना भेटण्यासाठी आल्या असताना त्यांच्याशी भांडण का केले, असा जाब आरोपींनी विचारला. याच कारणावरून वाद वाढला आणि चौघांनी मिळून हसन खान यांना लाकडी राफ्टरने मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस कर्मचारी रामेश्वर फासे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!