Advertisement Advertisement

डोणगाव-मालेगाव रोडवर काळाचा घाला! १८ वर्षांच्या उमेशचा अपघातात दुर्दैवी अंत; काही वेळातच दुसरी दुचाकी पुलाखाली, आणखी एक गंभीर!

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): डोणगाव-मालेगाव रोडवर भरधाव वाहनाच्या धडकेत १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. डोणगावपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर माता अनुसया वेअर हाऊसजवळ हा अपघात झाला. अपघाताची तीव्रता एवढी होती की, मृत युवकाची ओळख पटविणेही कठीण झाले होते.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विजय अजमिरे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत युवकाची ओळख सुरुवातीला पटली नव्हती. मात्र, मृतदेहाची माहिती सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर त्याची ओळख पटली. उमेश रवी भोसले (वय १८, रा. आरेगाव, ता. मेहकर) असे मृत युवकाचे नाव असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, याच अपघातस्थळापासून काही अंतरावर काही वेळातच दुसरा अपघात घडला. एमएच-३७-एजी-२५५२ क्रमांकाची पल्सर दुचाकी पुलाखाली कोसळली. या अपघातात रिसोड तालुक्यातील लेहणी येथील विठ्ठल मोरे हे गंभीर जखमी झाले.

एकाच रस्त्यावर काही वेळाच्या अंतराने दोन अपघात घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एका अपघातात तरुणाला जीव गमवावा लागला, तर दुसऱ्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. डोणगाव-मालेगाव मार्गावरील या घटनांमुळे वाहनांच्या वेगाचा आणि रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!