Advertisement Advertisement

इन्स्टाग्रामवर बदनामीचा बाजार मांडला; महिलेच्या प्रेमसंबंधांवरून रिल्स टाकल्या, पतीलाही पाठवले आक्षेपार्ह मेसेज; पुण्याच्या पठ्ठ्यावर खामगावात गुन्हा!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): सोशल मीडियावर एखाद्याची बदनामी करणे आता चांगलेच महागात पडू शकते. इन्स्टाग्रामवर एका २९ वर्षीय महिलेबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहून रिल्स प्रसारित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढेच नव्हे, तर महिलेच्या पतीच्या मोबाइलवरही बदनामीकारक संदेश पाठविण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील ३५ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २९ वर्षीय महिलेची आरोपी तुकाराम बाळासो रासकर (वय ३५, रा. इंदापूर, जि. पुणे) याच्याशी ओळख होती. २० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास महिला घरी असताना तिच्या जावयाचा फोन आला. आरोपीने महिलेबाबत बदनामीकारक लिखाण करून ते इन्स्टाग्रामवरील रिल्सच्या माध्यमातून प्रसारित केल्याची माहिती त्याने दिली.

यानंतर महिलेने स्वतःच्या मोबाइलवर इन्स्टाग्राम उघडून पाहिले असता, आरोपीने तिच्या प्रेमसंबंधांबाबत तसेच लग्नासंदर्भात आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर लिहिल्याचे दिसून आले. एवढ्यावरच न थांबता १२ नोव्हेंबर २०२६ रोजी महिलेच्या पतीच्या मोबाइलवरही आरोपीने संदेश पाठवून तिच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे आपली समाजात बदनामी झाल्याचे महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी तुकाराम रासकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८, ७९ व ३५६ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण राऊत करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!