Advertisement Advertisement

“ नवऱ्यानं अन् सासरच्यांनी बाईचं आयुष्य हैराण केलं; देराला पण दम निघाला नाही!

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरात बायकांवरच्या अत्याचाराला काहीच आळा बसत नाहीये. गेल्या ४८ तासांतली ही दुसरी घटना समोर आल्यामुळे मलकापुरात संतापाचं वातावरण पसरलंय. चारित्र्यावर संशय घेऊन आणि “वांझोटी” म्हणत एका २८ वर्षांच्या विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी पतीसह सासरच्या तब्बल ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती भगवान कुवारे (वय २८, रा. चिखलगाव, ता. जि. अकोला, सध्या अनुराबाद, ता. मलकापूर) हिचं लग्न १५ फेब्रुवारी २०२१ रोजी भगवान कुवारे याच्याशी झालं होतं. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण काही दिवसांनी नवरा आणि सासरच्यांनी तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायला सुरुवात केली.

दोन वर्षे झाली तरी अपत्य नाही म्हणून तिला “वांझोटी” म्हणत सतत टोमणे मारले गेले. पीडितेने “उपचार करा” अशी विनंती केली असता, सासरच्यांनी थेट हुंड्याची मागणी करत “माहेरून १ लाख रुपये घेऊन ये, नाहीतर इलाज नाही” असं सुनावलं.

या सततच्या जाचाला कंटाळून ती गेल्या वर्षभरापासून माहेरीच राहत आहे. या काळात सासरकडून कुणीही विचारपूस केली नाही. शेवटी त्रास सहन न झाल्याने तिने पोलिसांत धाव घेतली.

दरम्यान, या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे. पीडितेच्या दिराची तिच्यावर वाईट नजर होती. याबाबत तिने नवरा आणि सासरच्यांकडे तक्रार केली असता, उलट तिलाच धमक्या देण्यात आल्या. नवरा भगवान कुवारे हा कुटुंबाच्या सांगण्यावरून तिच्यावर संशय घेत सतत मारहाण करत होता.

या प्रकरणी पती, सासू, सासरे, तीन दीर आणि नणंद अशा ७ जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!