Advertisement Advertisement

“लग्नाच्या मिरवणुकीत डीजेवरून भांडण… आनंदातच झाली धुमश्चक्री!”

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): लग्नाच्या आनंदोत्सवाला गालबोट लावणारी घटना खामगाव तालुक्यातील जयपूर लांडे येथे घडली. डीजेवर वाजणाऱ्या गाण्यावरून सुरू झालेला वाद चिघळत जाऊन मारहाणीपर्यंत पोहोचला. या प्रकरणी १२ ते १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १० एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास परमेश्वर गोपाल बेलोकार (वय ३२, रा. जयपूर लांडे) यांच्या नातेवाईकांच्या लग्नाची मिरवणूक गावातून निघाली होती. मिरवणुकीदरम्यान डीजेवर गाणे वाजवण्याच्या कारणावरून सागर रमेश पवार व ऋषिकेश दयालसिंग पवार यांच्यात वाद निर्माण झाला.

हा वाद काही वेळातच चिघळत गेला आणि सागर पवार, ऋषिकेश पवार, मोहन संजय पवार, सूर्यकांत राजू पवार उर्फ छोटू, सौरभ रामसिंग पवार तसेच अन्य ७ ते ८ जणांनी एकत्र येत मिरवणुकीतील लोकांवर काठ्या-लाठ्यांनी हल्ला चढविला. या मारहाणीत फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना दुखापत झाली.

याशिवाय, लग्नाच्या वाहनाची काच फोडून नुकसानही करण्यात आले. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!