Advertisement Advertisement

“तु देऊळगावला महि का राहतेस?” म्हणत संताप; जीवे मारण्याची धमकी..

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : गेल्या काही वर्षांपासून क्षुल्लक कारणांवरून विभक्त राहत असलेल्या पती-पत्नीतील वादाने हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सरंबा येथे ७ एप्रिल रोजी पतीने पत्नीला रस्त्यात अडवून काठीने मारहाण केल्याची घटना घडली असून, पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरंबा येथील रहिवासी सविता विलास जगधने (वय ५५) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्या आपल्या मुलांसह देऊळगाव मही येथे वास्तव्यास आहेत. याच कारणावरून आरोपी पती विलास प्रकाश जगधने (रा. नवीन मंडप, सरंबा फाटा, ता. देऊळगाव राजा) याने राग मनात धरला होता.

दरम्यान, फिर्यादी या शेतातील काम आटोपून घरी जात असताना आरोपी दारूच्या नशेत पाठीमागून आला. “तू देऊळगाव मही का राहतेस?” असा जाब विचारत त्याने काठीने डाव्या हाताच्या मनगटावर तसेच कपाळावर मारहाण केली. यानंतर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायद्यान्वये कलम ११८(१), ३५२, ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!