मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मैत्रीणीकडे जाते असे सांगून घरून निघालेली २१ वर्षीय युवती घरी परत न आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चुलत भावाने दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
सुनिल चव्हाण (रा. छत्रपती शिवाजी नगर, मलकापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची चुलत बहीण इशिका अनिल चव्हाण (वय २१) ही जनता कॉलेजमध्ये बी.ए. प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. दिनांक २ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ती मैत्रीणीकडे जाते असे सांगून घरातून निघून गेली. मात्र त्यानंतर ती घरी परतली नाही.
कुटुंबीयांनी परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला, परंतु तिचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
युवतीचे वर्णन :
सदर युवतीचा रंग गोरा असून केस काळे आहेत. उंची अंदाजे ५ फूट २ इंच आहे. डोळ्यांवर गोल आकाराचा चष्मा आहे. अंगात निळ्या रंगाचा टॉप व काळ्या रंगाची लेंगी, पायात कोल्हापुरी चप्पल असून तिच्याकडे गुलाबी रंगाची बॅग व मोबाईल आहे.
मलकापूर शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा वर्णनाची युवती कुठेही आढळल्यास त्वरित जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा मलकापूर शहर पोलिसांशी संपर्क साधावा.












