चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज)तालुक्यातील शेतरस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सुमारे 98 लाख रुपये खर्च करून करण्यात आलेले हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे.
संबंधित रस्त्याचे काम सुरू असताना आवश्यक निकष पाळले गेले नाहीत.!रस्त्यावर योग्य प्रकारे मुरूम व खडी टाकली नसल्याने काही दिवसांतच रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्या-येण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे!
स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले की, काम करताना गुणवत्तेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच काम पूर्ण झाल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी, शासनाचा निधी वाया गेला असून शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे!
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे!













