Advertisement Advertisement

हॉटेल मालक घरी अंघोळीला गेल्याची संधी साधत; नोकर ने तेवढ्यात कार्यक्रम उरकला!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) – हॉटेल मालक घरी अंघोळीला गेल्याची संधी साधत हॉटेलमधील लॅपटॉप, टॅब आणि कार घेऊन फरार झालेल्या नोकराला शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत जेरबंद केले. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दालफैल, खामगाव येथील श्रीकांत प्रदीपराव देशमुख (वय ३२) यांचे हॉटेल व लॉजिंग व्यवसाय आहे. त्यांनी सुनील विश्वनाथ नेमाणे (वय ३०, रा. अमडापूर नाका, सजनपुरी) याला कामावर ठेवले होते. १ एप्रिल २०२६ रोजी देशमुख हे अंघोळीसाठी घरी गेले असताना, आरोपीने संधी साधत हॉटेलच्या काउंटरवरील मोटोरोला कंपनीचा टॅब (२० हजार), एचपी कंपनीचा लॅपटॉप (३५ हजार) आणि रेनॉल्ट क्विड कार (एमएच-१२-टीडी-५२९५, किंमत २.५० लाख) असा एकूण ३.०५ लाखांचा ऐवज चोरून पळ काढला.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच ठाणेदार अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पुरी, पोलीस कर्मचारी संदीप टाकसाळ, केशव झाल्टे, पल्लवी बोर्डे, विशाल सोनवणे तसेच सायबर विभागाचे राजू आडवे व कैलास यांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवली.

दरम्यान, जुना टोल नाका परिसरात संशयास्पदरीत्या उभी असलेल्या मोरपंखी रंगाच्या कारची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ धाव घेतली.

पाहणीदरम्यान कारमध्ये बसलेला इसम हा सुनील नेमाणे असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!