Advertisement Advertisement

धारदार शस्त्राने तरुणावर हल्ला; शेगावात खळबळ, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल…

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील डगडाळीपुरा परिसरात एका १९ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली असून या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनायक गजानन गोरे (वय ४८, रा. धनगर नगर, शेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा विक्रम विनायक गोरे (वय १९) हा २८ मार्च रोजी सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर मित्रासोबत बाहेर गेला होता. रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास त्याला शेगाव येथील समोसा रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली.

जखमी विक्रमने दिलेल्या माहितीनुसार, डगडाळीपुरा येथील गुरुकृपा गेस्ट हाऊससमोरील सद्दाम यांच्या हॉटेलवर चहा पिण्यासाठी गेला असता आरोपी श्याम पाटील (रा. मोदी नगर, शेगाव) याने जुन्या वादाच्या कारणावरून शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर हातातील धारदार शस्त्राने मानेवर वार करून त्याला गंभीर जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.

जखमी विक्रमवर समोसा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जीएमसी रुग्णालय, अकोला येथे हलविण्यात आले आहे.या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन गावंडे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!