देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील टाकरखेड भागिले येथील स्वप्नपूर्ती वाईन बारमध्ये अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना समोर आली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप देवराव कांबळे (वय ५३, रा. त्रंबक नगर, देऊळगाव राजा) यांच्या ताब्यातील वाईन बारमध्ये २३ मार्च रोजी रात्री ९.३० ते २४ मार्च सकाळी ८.२० या दरम्यान ही चोरी झाली.
चोरट्याने दुकानाचा कोंडा तोडून आत प्रवेश केला आणि सुमारे ३ हजार रुपये रोख रक्कम, डीव्हीआर, वायफाय यंत्रणा तसेच सीसीटीव्ही कॅमेरे असा एकूण सुमारे १३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे, पुरावे नष्ट करण्यासाठी चोरट्याने सीसीटीव्हीच उचलून नेल्याचे दिसून येत आहे.
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कायम अप नंबर ११२/२०२६ नुसार कलम ३३४(१), ३०५ बीएनएस अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस हवालदार शरद साळवे यांच्याकडे सोपविण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.














