पिंप्री गवळी (बुलडाणा कव्हरेज न्युज) जवळच असलेल्या कोल्ही गवळी येथील एका इसमाने घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्याची घटना समोर आली असून तो अद्यापपर्यंत सापडलेला नाही. याप्रकरणी मुलाने धामणगाव बढे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश उखर्डा प्रधान (वय २१, रा. कोल्ही गवळी, ता. मोताळा) यांनी १५ मार्च रोजी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचे वडील उखर्डा लहानू प्रधान (वय अंदाजे ५७) हे ५ ऑक्टोबर २०२५ रोजी राहत्या घरातून कोणालाही न सांगता निघून गेले. त्यानंतर नातेवाईकांनी व कुटुंबीयांनी विविध ठिकाणी शोध घेतला, मात्र आजपर्यंत त्यांचा काहीच मागमूस लागलेला नाही.
बेपत्ता इसमाचे वर्णन असे – उंची सुमारे ५.३ फूट, सडपातळ बांधा, लांब नाक, सावळा रंग, लांबट चेहरा. अंगात पांढरा शर्ट व पांढरी फुल पॅन्ट, पायात काळ्या रंगाचे बूट, तसेच सोबत काळ्या रंगाची शबनम बॅग होती.
सदर वर्णनाची व्यक्ती कुठेही आढळल्यास धामणगाव बढे पोलीस स्टेशनचे ठाणेदार नागेश जायले (मो. ९८८१०६८१००) किंवा तपासणी अंमलदार हेकाँ संजय जवरे (मो. ९५५२५७१७९२) यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.














