Advertisement Advertisement

माझ्या कडे कशाला बघतो ?तुझ्याकडे कशाला बघू, तू काय मुलगी आहेस का? कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण; युवक गंभीर जखमी….

चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): काहीही कारण नसताना घरात येऊन कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून युवकाला गंभीर जखमी केल्याची घटना ३ मार्च रोजी शेळगाव आटोळ येथे घडली. या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शेळगाव आटोळ येथील रहिवासी नितीन भिमराव जाधव (वय ३०) हे आपल्या मित्र गणेश मदन मोरे यांच्या घरी बसून गप्पा मारत होते. त्यावेळी गावातील दगडू भाऊराव बर्डे हा तेथे आला व “माझ्याकडे का बघतो?” असे विचारू लागला. त्यावर जाधव यांनी “तुझ्याकडे कशाला बघू, तू काय मुलगी आहेस का?” असे म्हटल्याने वाद निर्माण झाला.

या वादातून संतापलेल्या दगडू बर्डे याने हातातील कुऱ्हाडीच्या दांड्याने जाधव यांच्या उजव्या हाताच्या दंडावर तसेच उजव्या पायाच्या टोंगळ्याजवळ मारहाण केली. या मारहाणीत जाधव गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे दाखल करण्यात आले आहे.

या घटनेप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी दगडू भाऊराव बर्डे, रा. शेळगाव आटोळ यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१) अंतर्गत अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!