खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):खामगाव शहरात अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून आरोपीविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी २ मार्च सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास पीडित मुलगी जवळच्या दुकानात चिप्सचे पाकीट घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी दुकानदार नीलेश मोरे (वय ४०) याने पाकीट देताना तिच्याशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुलीने या प्रकाराला विरोध केल्यानंतर “हा प्रकार कोणाला सांगू नको” अशी धमकीही आरोपीने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. घरी आल्यानंतर मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर आईने खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.













