Advertisement Advertisement

विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू; मोताळा तालुक्यातील घटना….

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील भोरटेक येथे शेतातील घरात वीजपंप बसविताना विजेचा जोरदार धक्का लागून ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २ मार्च रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास घडली. महादेव भानुदास गवळी (वय ३५) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महादेव गवळी हे आपल्या शेतातील घरामध्ये पाण्यासाठी वीजपंप बसविण्याचे काम करीत होते. काम सुरू असताना अचानक त्यांना विजेचा जोरदार करंट लागला. घटनेनंतर कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ मोताळा येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

महादेव गवळी यांच्या अकाली निधनामुळे भोरटेक गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने गवळी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी, पत्नी, दोन लहान मुले व तीन महिन्यांची चिमुकली मुलगी असा मोठा परिवार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!