Advertisement Advertisement

व्हॉट्सअ‍ॅप द्वारे चॅटिंगचा व्हिडिओ का पाठवला? आता तुला मारून टाकतो! अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) अंढेरा येथे जावयाने सासऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेल्या व्हिडिओबाबत जाब विचारला असता आरोपीने शिविगाळ करत मारहाण केली आणि दगडाने डोक्यात वार करून जखमी केले. या प्रकरणी पोलिसांनी २१ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गा वैजनाथ डोंगरे यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या मुलगी स्वाती हिचे लग्न सुमारे एक वर्षापूर्वी अंढेरा येथील प्रभू भगवान चाटे याच्यासोबत झाले होते. मात्र, पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याने स्वाती हिने नोव्हेंबर महिन्यात मुंबई येथे गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

या प्रकरणी प्रभू चाटे याच्याविरुद्ध मुंबई येथे गुन्हा दाखल होऊन त्याला कारावासही भोगावा लागला होता.

दरम्यान, मृत मुलीचे आई-वडील मुंबईहून वाघाळा येथे आले असताना आरोपी प्रभू चाटे याने त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे चॅटिंगचा व्हिडिओ पाठवला. हा व्हिडिओ का पाठवला, याबाबत विचारण्यासाठी ते अंढेरा येथे गेले असता आरोपीने संतापून शिविगाळ केली व “तुला मारून टाकतो” अशी धमकी दिली.

यानंतर आरोपीचा भाऊ विष्णू भगवान चाटे हा देखील तेथे आला व दोघांनी मिळून सासऱ्यावर चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. पुढे प्रभू चाटे याने हातातील दगडाने फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले.

या घटनेनंतर महिलेच्या तक्रारीवरून अंढेरा पोलीस ठाण्यात आरोपी प्रभू भगवान चाटे व इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!