शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील एक विवाहित महिला अचानक घरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी २९ ऑक्टोबर रोजी शेगाव शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेच्या पतीने याबाबत तक्रार दिली आहे. त्यांची पत्नी १९ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली. बराच वेळ होऊनही ती घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली.
नातेवाइकांसह विविध ठिकाणी शोधाशोध करूनही महिलेचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर पतीने शेगाव शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. कोणीतरी फूस लावून पत्नीला पळवून नेले असावे, असा संशयही पतीने तक्रारीत व्यक्त केला आहे.
या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १४० (३) अन्वये गुन्हा दाखल केला असून, बेपत्ता महिलेचा शोध घेण्यासह पुढील तपास सुरू आहे.












