Advertisement Advertisement

देऊळगाव राजा हादरलं! हॉटेलसमोर संशयास्पद हालचाल; पोलिसांनी केली झडती अन् सापडला गांजा

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ५.०५० किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास टाकरखेड भागिले शिवारातील गजानन महाराज हॉटेलसमोर ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक राजकुमार हनमत मोहोळकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी संशयास्पद हालचाली करत असलेल्या एका युवकाची झडती घेतली असता त्याच्याकडे गांजासदृश अंमली पदार्थ आढळून आला. तपासणीदरम्यान एकूण ५.०५० किलो गांजा जप्त करण्यात आला.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची बाजारातील अंदाजे किंमत सुमारे १ लाख १ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच आरोपीकडून सुमारे १० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून, एकूण १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला आहे.

या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत असून, अंमली पदार्थांविरोधातील कारवाईमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!