Advertisement Advertisement

“आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या भेटीला निघा निर्धास्त! चिखली आगारातून पंढरपूरसाठी ४० स्पेशल एसटी; ज्येष्ठांना मोफत, महिलांनाही सवलत!”

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी व भाविकांसाठी चिखली एसटी आगाराने विशेष नियोजन केले आहे. यंदा २५ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीसाठी चिखली आगारातून तब्बल ४० विशेष एसटी बस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी ज्येष्ठ नागरिक व महिलांना मिळणाऱ्या भाडे सवलती यावेळीही कायम ठेवण्यात आल्या आहेत.

आगारप्रमुख जोगदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली टी. आय. मगर हे या विशेष बस व्यवस्थेचे नियोजन पाहत आहेत. यात्रेदरम्यान भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी प्रवास मिळावा यासाठी आगार प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे.

विशेष म्हणजे, एखाद्या गावातून, संस्था, भजनी मंडळ किंवा वारकरी दिंडीतील किमान ४० प्रवासी एकत्र आल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी इच्छुकांनी आगाऊ नोंदणी करून बस आरक्षित करावी, असे आवाहन स्थानक प्रमुख नागरे यांनी केले आहे.

ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास…

‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत ७५ वर्षे किंवा त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. मात्र, प्रवासावेळी वयाचा पुरावा दर्शविणारे वैध ओळखपत्र सोबत असणे आवश्यक आहे.

थोडक्यात…

आषाढी एकादशी : २५ जुलै

चिखली आगारातून ४० विशेष एसटी बस

महिलांसाठी भाडे सवलत कायम

७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास

४० प्रवासी एकत्र आल्यास गावातून विशेष बसची सुविधा

आगार नोंदणी करून बस आरक्षित करण्याचे आवाहन.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!