Advertisement Advertisement

हातनी फाट्याजवळ थरारक अपघात! भरधाव एसटीने १५ दुचाकी चिरडल्या….

बुलडाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज) – बुलडाणा ते चिखली महामार्गावरील हतनी फाट्याजवळ आज दुपारी भीषण अपघात घडला. भुसावळ आगाराच्या भरधाव एसटी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तब्बल १० ते १५ दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सुमारे २:१५ वाजेच्या सुमारास परिसरात अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसापासून बचाव करण्यासाठी महामार्गावरील अनेक दुचाकीस्वारांनी हतनी फाट्याजवळील झाडांचा आडोसा घेतला होता. त्यांनी आपल्या दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या करून स्वतः सुरक्षित अंतरावर उभे राहणे पसंत केले.

दरम्यान, चिखलीकडून बुलडाण्याकडे येणारी भुसावळ आगाराची एसटी बस (क्रमांक MH 20 BL 2992) अचानक अनियंत्रित झाली. बस थेट रस्त्याच्या खाली उतरली आणि कडेला उभ्या असलेल्या दुचाकींना एकामागून एक जोरदार धडक देत पुढे गेली. या धडकेत अनेक दुचाकींचा चक्काचूर झाला.

घटनास्थळी काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अपघाताच्या वेळी सर्व दुचाकीस्वार झाडाखाली उभे असल्याने मोठा अनर्थ टळला. जर एखादा प्रवासी दुचाकीवर बसलेला असता, तर गंभीर जीवितहानी झाली असती, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली.

अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नसून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!