Advertisement Advertisement

आनाळकर साहेब तुम्ही थोडं लक्ष द्या हो; तो शिक्षक दारू पिऊन येत होता म्हणते शाळेत?

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ सर्कलमधील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दारूच्या नशेत शाळेत येत असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि शैक्षणिक वातावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालक व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षकाविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून एक तक्रार करण्यात आली ल्आहेत. तरीही संबंधित शिक्षक कोणतीही भीती न बाळगता नियमितपणे शाळेत हजर होत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे “तक्रारी असूनही कारवाई का होत नाही?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणाची गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही ग्रामस्थांनी “तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का?” अशी शंका व्यक्त केली आहे.

दरम्यान, अशा प्रकारच्या गैरवर्तनामुळे जिल्हा परिषद शाळांची प्रतिमा मलिन होत असून इतर प्रामाणिक शिक्षकांवरही त्याचा परिणाम होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन चौकशी करून दोषी शिक्षकावर योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार चर्चा परिसरातून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!