Advertisement Advertisement

अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवले; डोणगाव पोलिसांत गुन्हा दाखल..

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना १५ एप्रिल रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून डोणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी ही आपल्या घराजवळून बेपत्ता झाली होती. याप्रकरणी गावातीलच अक्षय अशोक राठोड (वय २०) याने मुलीला फुस लावून आपल्या ताब्यात नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून हालचाली वेगाने सुरू करण्यात आल्या आहेत. आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू असून पुढील तपास डोणगाव पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!