Advertisement Advertisement

कांदा बियाण्याची मोठी चोरी ; ४.६५ लाखांचा माल लंपास..! देऊळगाव राजा परिसरातील घटना…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील पिंपळनेर येथील सिंदखेडराजा रोडवरील जुब्बूजी बायोमास ब्रिक्रेट इंडस्ट्री कंपनी परिसरातून तब्बल ४ लाख ६५ हजार ५०० रुपये किमतीचे कांदा बियाणे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तीन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मोहम्मद अझहर मोहम्मद कलंदर (वय ३६, रा. महात्मा फुले रोड, भाजीमंडी, देऊळगाव राजा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादी हे सिड्स कंपनीशी संबंधित असून, प्रोसेसिंगसाठी आणण्यात आलेले अथर्व सिड्स कंपनीचे कांदा बियाणे जुब्बूजी बायोमास ब्रिक्रेट इंडस्ट्रीच्या परिसरात ठेवण्यात आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ मे २०२६ रोजी रात्री ११.३८ ते २५ मे रोजी पहाटे ४ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी कंपनी परिसरात प्रवेश करून कांदा बियाण्याच्या एकूण १४ बॅगा लंपास केल्या.

चोरीस गेलेल्या मालामध्ये प्रत्येकी ३३ किलो वजनाच्या सात बॅगा, किंमत १ लाख ६१ हजार ७०० रुपये, तसेच प्रत्येकी ६२ किलो वजनाच्या सात बॅगा, किंमत ३ लाख ३ हजार ८०० रुपये असा एकूण ६ क्विंटल ६५ किलो वजनाचा कांदा बियाण्याचा साठा होता. या मालाची एकूण किंमत ४ लाख ६५ हजार ५०० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!