Advertisement Advertisement

“ शेतकऱ्यांना कॅन मध्ये डिझेल द्या हो…!” l भाजपा युवा मोर्चाचे संतोष काळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): खरीप हंगाम तोंडावर आल्याने जिल्ह्यात शेतीच्या मशागतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. अशातच पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांना निवेदन देण्यात आले.

आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष काळे पाटील यांच्या नेतृत्वात शुक्रवारी (दि. १३) जिल्हाधिकारी कार्यालयात हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सुरक्षेच्या कारणास्तव अनेक पेट्रोल पंप चालक वाहनांच्या टाकीतच डिझेल भरत असून कॅनमध्ये डिझेल देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे शेतात सुरू असलेली कामे थांबवून ट्रॅक्टर पंपावर न्यावा लागत असल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि अतिरिक्त डिझेल खर्च होत आहे.

वेळेत नांगरणी व वखरणीची कामे पूर्ण न झाल्यास खरीप हंगामावर परिणाम होण्याची भीतीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरची आर.सी. बुक दाखवल्यानंतर दररोज किमान तीन हजार रुपयांपर्यंतचे डिझेल कॅनमध्ये देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

तसेच नाफेड केंद्रांवर मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक सुरू असून वाहतुकीसाठी लागणारे डिझेलही सहज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांना याबाबत लेखी आदेश देऊन जिल्हा पुरवठा विभागामार्फत अंमलबजावणी करावी, अशी विनंतीही प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

“शेती हा राज्याचा कणा आहे. शेतकरी जगला तर देश जगेल. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,” अशी भावना निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली.

यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष काळे पाटील, उपाध्यक्ष विशाल विसपुते, नीरज गायकवाड, बंडूभाऊ अंभोरे, वैभव लाड, पंढरी गावंडे, दत्ताभाऊ शेवाळे, पंजाबराव देशमुख, सतीश गावंडे, दीपक पाटील भाकडे, वसुदेव राजपूत, फकीर कराडे, निलेश मुठ्ठे, अजय खराटे, करण बेंडवाल, प्रतीक गायकवाड, कार्तिक गावडे, मंगल वाघमारे यांच्यासह भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!