चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली तालुक्यातील एका गावातून एक १८ वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चिखली तालुक्यातील एका पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
चिखली तालुक्यातील एका गावातून येथील एक तरुणी आहे. ही तरुणी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली असून ती अद्याप घरी परतली नाही.
नातेवाईकांनी गाव, परिसर तसेच सर्व नातेवाइकांकडे कसून शोध घेतला. मात्र, तिचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही.
सदर मुलीचा रंग सावळा असून बांधा सडपातळ आहे. बेपत्ता होताना तिने काळ्या रंगाचा पंजाबी टॉप व पिवळ्या रंगाची लेगीज परिधान केलेली होती.
सदर घटनेचा अधिक तपास अमडापूर पोलीस करत असून, नागरिकांना काही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.













