Advertisement Advertisement

पहिले प्रियकराने तिच्या विश्वास संपादन केला,लग्नाचे आमिष दाखवून तिच्या सोबत वारंवार ….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) बुलढाणा शहरात एका विवाहित महिलेची लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक व अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने महिलेचा विश्वास जिंकून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि अखेर तिची दुचाकी व मोबाईल घेऊन फरार झाला. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जगदंबा नगर येथे राहणाऱ्या २३ वर्षीय विवाहित महिलेची पतीपासून फारकत झालेली आहे. तिच्या या परिस्थितीचा फायदा घेत आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून जवळीक साधली. “तुझ्याशी लग्न करून तुला सुखात ठेवेन,” असे सांगून तिचा विश्वास संपादन करण्यात आला.

तक्रारीनुसार, २०२३ पासून आरोपीने पीडितेला आपल्या जाळ्यात ओढले. शेगाव येथील एका हॉटेलमध्ये नेऊन प्रथम अत्याचार केला. त्यानंतर विविध ठिकाणी नेऊन वारंवार तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. १ जानेवारी २०२६ रोजी मित्राच्या घरी तसेच १६ व १७ एप्रिल २०२६ रोजी रामनगर भागातही अशाच प्रकारे अत्याचार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

१८ एप्रिल रोजी जयस्तंभ चौक येथे दोघे पावभाजी खाण्यासाठी गेले होते. त्यानंतर लेंडी तलाव परिसरात बसले असताना आरोपीने “पाच मिनिटांत येतो” असे सांगून पीडितेची सुझुकी एक्सेस दुचाकी आणि मोबाईल घेऊन पळ काढला. बराच वेळ झाला तरी तो परत न आल्याने आणि मोबाईल बंद लागत असल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर पीडित महिलेने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

समाजासाठी इशारा…

लग्नाचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक व शोषण करण्याच्या घटना वाढत असल्याचे या प्रकारातून दिसून येते. अशा घटनांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!