Advertisement Advertisement

कुलरमध्ये पाणी टाकताना करंटचा धक्का; २४ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

मेहकर (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : मेहकर शहरातील रामनगर परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण शहर हळहळले आहे. ऐन तारुण्याच्या उमेदीच्या वयात २४ वर्षीय गौरव शिंदे याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. या आकस्मिक घटनेमुळे शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गौरव शिंदे हा तरुण दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास घरी जेवण करत होता. वाढत्या उकाड्यामुळे घरातील कुलरमध्ये पाणी कमी झाल्याचे लक्षात आल्याने तो चालू असलेल्या कुलरमध्ये पाणी टाकण्यासाठी गेला. मात्र यावेळी अचानक विजेचा जोरदार धक्का बसल्याने तो खाली कोसळला.


घटनेची माहिती मिळताच शेजारील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत गौरवचा मृत्यू झाला होता. तरुण वयात झालेल्या या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून शिंदे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


कुलर वापरताना घ्या विशेष काळजी….


या घटनेनंतर कुलरच्या सुरक्षित वापराबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

उन्हाळ्यात कुलरचा वापर मोठ्या प्रमाणात होत असताना नागरिकांनी काही महत्त्वाच्या बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे.


कुलरमध्ये पाणी टाकण्यापूर्वी नेहमी स्विच बंद करून वीजपुरवठा खंडित करावा.
शक्य असल्यास लोखंडी कुलर घराच्या बाहेरील खिडकीजवळ किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवावा.


कुलरच्या वायरिंगची वेळोवेळी तपासणी करावी.


पंखा किंवा मोटारीजवळील वायर कटिंग, सैल जोड किंवा विद्युत गळती होत नाही ना याची खात्री करावी.


कुलरला योग्य अर्थिंग असणे आवश्यक आहे.
लहान मुलांचा कुलरला थेट स्पर्श होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.


गौरव शिंदे यांच्या दुर्दैवी मृत्यूने विद्युत उपकरणे वापरताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे, याची पुन्हा एकदा जाणीव करून दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!