Advertisement Advertisement

निवडणुकीच्या राग मनात धरून मारहाण; बंदूक, तलवार व चाकूने हल्ला, सहा जणांवर गुन्हा….

नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत आपल्या बाजूने काम केले नाही, या कारणाचा राग मनात धरून एका व्यक्तीवर बंदूक, तलवार आणि चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना नांदुरा येथे घडली. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख शाहिद शेख चांद कुरेशी यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, नगरपरिषद निवडणुकीदरम्यान त्यांनी आरोपींच्या बाजूने काम केले नव्हते. त्यावरून आरोपी त्यांना सातत्याने धमक्या देत होते. त्याच रागातून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी एकत्र करून फिर्यादीवर हल्ला केला.

यावेळी आरोपी शेख साजिद शेख इमाम याने मोटारसायकलच्या डिक्कीतून बंदूक काढून तिच्या मुठीने फिर्यादीच्या डोक्यावर मारहाण केली. तसेच शेख फैजान शेख शकील व शेख रियाज शेख मुनाफ यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, शेख रहेमान शेख गफूर, शेख इमरान शेख इमाम आणि शेख फारुख शेख रसूल यांनी तलवार व चाकूने वार करून फिर्यादीला गंभीर जखमी केले व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित सहा आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 109(1), 118(1), 115(2), 351(2)(3), 189(2), 191(2) तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!